# 1514: कासवांचे गाव. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 427708830 series 3431535
कासवाची मादी किनाऱ्यावर येण्यापूर्वीच गावातील बरेचसे लोक किनाऱ्यावर जाऊन बसायचे. मादी येताना दिसली की, एक जागेवर शांत बसून राहायचे. तिने अंडी घालायला सुरुवात केली की, तिच्या जवळ जाऊन मागच्या बाजूने वाळू बाजूला काढून त्यात पिशवी लावायचे. वाळूत अंडी न पडता पिशवीत पडायची. मादी कासवाची अंडी घालून झाली की पिशवी काढून सगळी अंडी घरी घेऊन जायचे. आणि मग गुरांच्या गोठ्यामध्ये किंवा घराच्या मागच्या अंगणात चुलीवर ती शिजवून त्याचा पोळा खायचा आणि आंघोळ करून मग घरात यायचे, असा जणू अलिखित नियमच बनला होता.
1585 episodes