# 1508: पंढरपूर वारीचा इतिहास भाग-१. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 426032366 series 3431535
वारी ही १००० वर्षांहून जुनी परंपरा आहे ज्याचे पालन करणारे वारकरी "वारी नावाच्या प्रथेचे" पालन करतात. पायी चालत जाण्याची ही जुनी प्रथा असल्याचे कारण पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजपर्यंत विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणं पसंत करतात.
या संदर्भात, पु. ल. देशपांडे यांनी म्हटलं आहे की,
मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेणे कधीही शक्य आहे, पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्ती भावानी एकमेकांना गळा मिठी घालतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यामधे होणारं विठ्ठलाचे दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे.
1552 episodes