Nachiket Kshire public
[search 0]
More
Download the App!
show episodes
 
A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे ! जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे ! जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे ! ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे ! सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका
  continue reading
 
Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परा ...
  continue reading
 
Loading …
show series
 
भाग ६८ मोटिवेशनल व्हिडिओस बघून आपण लगेच कामाला लागतो का ? मोटिवेशनचा डोस किती वेळ टिकतो ? काम करायला, सुरवात करायला मोटिवेशन आवश्यक आहे का ? अनुभव असं सांगतो कि मोटिवेशनचा डोस काही वेळात टाय टाय फीस होतो आणि आपण परत जैसे थे होतो. Motivation does not cause action, action motivates you to take further action ह्या अमृत देशमुखच्या वाक्यावर ह्या भागात ऊ…
  continue reading
 
भाग ६७ Find Your 'Why' Apple, Nike, Bose , Old Monk , ह्या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे ? ह्या सगळ्यांना एक कल्ट following आहे. पण त्यांनी हे कसं केलं ? सायमन सिनेक या लेखकाचे ‘स्टार्ट विथ व्हाय हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. त्यात त्याचे म्हणणे आहे, की ‘आपण कुठलीही गोष्ट ‘का’ करतो हे आधी माहिती हवं आणि मग ती कशी करायची हे आपण, आपणहून शोधून काढतो. त्याने …
  continue reading
 
कधी एखादी गोष्ट मनाप्रणारे झाली नाही, अर्धवट राहिली, कोणी धोका दिला, त्रास दिला तर आपण त्याचं विचारात जन्मभर जगतो. सतत बदल्याची भावना मनात असते. मधमाश्या ह्या एवढासा जीव, त्यांनी मेहेनतीने बनवलेलं पोळ काही क्षणात कोणीतरी तोडून घेऊन जातं, पण मधमाश्या कधीही मागचा विचार न करता, लगेच परत एकदा नवीन पोळ तयार करायला लागतात. आपण मधमाश्यांकडून हे शिकू शकतो …
  continue reading
 
आयुष्यात कठीण प्रसंगी निर्णय घेणं फार अवघड काम आहे. आपला निर्णय चुकला तर काय होईल ह्या भीतीने आपण बरेचदा निर्णयच घेत नाही. पण निर्णय न घेण्याने आपण बरेचदा आलेली संधीला मुकतो. डॉ शारदा बापट ह्यांच्या बरोबर झालेल्या गप्पांमध्ये बरंच काही शिकलो, पण प्रामुख्याने एक फॉर्मुला शिकलो, ज्याचा उपयोग निर्णय घेण्यात नक्कीच होतो आहे.…
  continue reading
 
Perfection Vs Consistency भाग २ मध्ये मला मेहक मिर्झा प्रभू हिच्याशी गप्पा करायची संधी मिळाली. तीन गोष्टी ह्या भागातून मला प्रकाशाने शिकायला मिळाल्या १) आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर, अगदी ध्यानी मनी नसताना, आपल्याला आपली passion सापडू शकते. ३) प्रयत्न करताना जरी फेल झालो तरी स्वतः वर प्रेम करणं सोडू नका ४) सातत्य हे perfection पेक्षा जास्त महत्व…
  continue reading
 
नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा. ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो. ४ मे २०२० ह्या दिवशी माझे हात थरथरत होते, खूप भीती वाटत होती, त्या सिटू…
  continue reading
 
कॉर्पोरेट मध्ये काम करता आहे का ? वयाची तिशी पार केली आहे ? असं असेल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कॉर्पोरेट जॉब मध्ये कंटाळा येणं, निराशा येणं, वरिष्ठांशी भांडण होणं, नको तितक्या स्पर्धेचा तिटकारा येणं असे अनेक प्रकार खूप घडतात. त्यातून पुढे चुकीचे निर्णय घेणं, नैराश्य येणं, वर्क-लाईफ बॅलेन्स बिघडणं अशे प्रकार घडतात. त्यांचा परिणाम घरी भांडण, मुला…
  continue reading
 
आपलं ध्येय सध्या न करण्यासाठी आपण स्वतःला कोणतं कारण देतो आहे ? वेळ नाही ! नशीब नाही ! गाईड मिळत नाही ! की इतर कोणतं कारण ? एकदा अनुरिमा सिंन्हा आणि तिच्या जिद्दीची हि गोष्ट ऐका आणि मग स्वतःच कारण किती योग्य आहे ते ठरावा. ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/ #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #ma…
  continue reading
 
गोष्ट ऐकायला आवडत नाही असा माणूस सापडणे कठीण. आजीच्या मांडीवर डोकेठेवून, शाळेच्या बाकावर, कॉलेज च्या कट्ट्यावर किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठेही आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आपल्या पॉडकास्टच्या नावातच कट्टा असल्यामुळे इथे गोष्टी असणारच. आपण नेहमी प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी त्यांच्या आवाजात ऐकतो, आज एक नवीन प्रयोग करून बघतो आहे. माझ्या आवाजात ए…
  continue reading
 
कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe) आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला कचरा डंप करण्याची जागा असतेच. ह्याला लँडफिलही म्हणतात. तुम्ही जर देवनार- मुंबई, उरुळी देवाची - पुणे, भांडेवाडी - ना…
  continue reading
 
ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम. आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते. पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे …
  continue reading
 
श्री प्रमोद श्रीपाद फळणीकर हे मध्यप्रदेश कॅडर चे IPS ऑफिसर. त्यांनी तिथे अनेक ठिकाणी सेवा दिली. त्यानंतर ते ITBP ( इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ) ; NSG ( नॅशनल सेक्युरिटी गार्ड ) ; CISF ( सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स ) अश्या महत्वाच्या संस्थांमध्ये काम केलं. CISF मध्ये असताना संपूर्ण भारतातल्या विमानतळांची सुरक्षा त्यांच्या अधिकाराखाली होती. …
  continue reading
 
कुठल्याही इतर माध्यमांसारखं इंटरनेट हे दुधारी तलवारीसारखं आहे. त्याचा चांगला आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारे वापर करून घेता येतो. इंटरनेट मुळे सोशल मीडिया, गेमिंग आणि इतर गोष्टींमागे वाहावत गेलेली लोकही आपण बघतो, तेच इंटरनेट चा वापर करून आपला घरगुती उद्योग वाढवायला आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला केलेला वापर हि आपण बघतो. पॉडकास्ट हे ह्या इंटरनेट म…
  continue reading
 
वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी करायची आहे ? स्क्रीन कडे न बघता अभ्यास अभ्यास करायचा आहे ? अंध विद्यार्थ्यांना पुस्तकाचा पर्याय हवा आहे ? ह्या सगळ्याच उत्तर म्हणजे श्राव्य रूपात समजावून सांगितलेले पाठ्यपुस्तकातील धडे. हीच संकल्पना घेऊन सचिन पंडित…
  continue reading
 
निसर्गोपचार - भाग ५४ - विदुला टोकेकर / EP 54 - Vidula Tokekar तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, पण वेळ मिळत नाही आहे. वयाच्या चाळीशीत, तिशीत किंवा अगदी विशीत थकवा जाणवतो आहे ? एनर्जी, स्टॅमिना कमी होताना जाणवतो आहे. तर मग हा एपिसोड तुमच्या करता आहे. अगदी नैसर्गिक पद्धतीने निरोगी कसं राहता येतं, निषारोपचार पद्धत नेमकी काय आहे, सुरवात कुठ…
  continue reading
 
भाग ५३ -लॉकडाउन चे फायदे !! २२ मार्च २०२० म्हणजे आज पासून ३ वर्षांपूर्वी जनता curfue आपण पाळला होता, आणि लगेच दुसऱ्यादिवशी पासून lockdown ची सुरवात झाली. आधी काही दिवसांचा वाटणारा lockdown पुढे अनेक महिने चालला. हा काळ अनेक लोकांसाठी अतिशय कठीण असा काळ होता, खूप लोकांना खूप अडचणी आल्या. आपण कल्पनापण करू शकणार नाही अश्या गोष्टी घडल्या. हे सगळं असं अ…
  continue reading
 
फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना? पहिलं प्रेम आठवतं आहे का? आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का? अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही.. लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागता…
  continue reading
 
५१ सकाळी लवकर उठावे का? अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे ! लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणज…
  continue reading
 
#Golden jubilee Inspiration katta चे ५० एपिसोड झालेत.. काही लोक म्हणतील इतका वेळ कसा लागला ५० एपिसोड साठी, तर काही म्हणतील इतक्या लवकर झालेत! लोक काहीतरी बोलणारच. पहिल्या एपिसोड च्या आधीची माझी स्थिती मला अजूनही आठवते.. इतका घाबरलो होतो मी, की शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं होत की ऑडियो फाईल डिलीट करावी.. मी कधीच माईक हातात घेतला नव्हता, माझा आवाज …
  continue reading
 
बरेचदा एखाद काम, हवं तेवढं उत्तम प्रकारे करता येत नाही आहे, ह्या भीतीने आपण ते काम करायचं नाही. ते काम कसं होणार आहे किंवा तुमच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, ह्याच्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. फक्त आपल्या त्याच्या रिझल्ट्स बद्दल असलेल्या अपेक्षांमुळे ते काम आपण पुढे ढकलत असतो. खरतर ते काम पुढे ढकलून ते नंतर चांगल्या पद्धतीने होणार नसतंच, तरीही…
  continue reading
 
Episode ४७ मध्ये आपण बघितलं की दिरंगाई, चालढकल, procrastination आपण का करतो, त्यामुळे काय नुकसान होऊ शकतं. त्याची कारणे काय ह्या विषयावर आपल्या काही guest बरोबर चर्चा केली. ह्या एपिसोड मध्ये आपण दिरंगाई, चालढकल न करता काम कसं करता येईल ह्या विषयावर चर्चा केली आहे. #procrastination #चालढकल #inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodca…
  continue reading
 
१ जानेवारी जवळ येतो आहे ! काही संकल्प केला आहे का नवीन वर्षासाठी ? मागच्या वर्षी केला होतात का ? मागच्या वर्षीच्या संकल्पचे काय झालं ? आपण नवीन काम किंवा चांगलं काम 26 डिसेंबरला किंवा अगदी 13 फेब्रुवारीला का सुरू करू शकत नाही ? चांगल्या कामासाठी, हितकर कामांसाठी नेहमी मुहूर्त का शोधल्या जातो ? चालढकल का होते ? Procrastination ह्या गोंडस शब्दाचा नेम…
  continue reading
 
एपिसोड ४६ - मुक्ता चैतन्य ( लेखक, पत्रकार ) Screen Time आजकाल रात्री आपण झोपतो सगळे इंस्टाग्राम रील्स बघून झाले की, गेम च्या सगळ्या लाईफ संपल्याकी, सोशल मीडिया वर फारसा बघायचं काही राहिलं नाही की. झोप आली किंव्हा अमुक एक वेळ झाली म्हणून आपलं झोपणं आता बंद झालं आहे का? हे आपल्या बाबतीत किंव्हा आपल्या जवळच्या कोणाच्या बाबतीत होतं आहे का ? आपण स्क्रीन…
  continue reading
 
इन्स्पिरेशन कट्टा भाग -४५ प्रिया बोडके नवीन पिढीतली शेतकरी खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे शेतकरी म्हंटलं की माझ्या सारख्या शहरी माणसासमोर दोन परस्परविरोधी चित्र उभे राहतात. एक म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि दुसरं म्हणजे शहरालगतच्या आपल्या जागा विकून मोठाल्या गाड्यांतून फिरणारे माणसं. शेतकऱ्याला कधी व्यवहार कळलाच नाही, उत…
  continue reading
 
श्राव्य माध्यमातून Narrative Storytelling - EP - ४४ - आदित्य कुबेर आज ४मे. आज इन्स्पिरेशन कट्टा ला २ वर्ष पूर्ण झालीत. मला कोणी विचारलं कि कसं वाटतं आहे, तर मी म्हणतो समाधान वाटतं आहे. ह्या दोन वषार्त ० ते ४५ एपिसोड, ० ते ८०,००० listens , ० ते नेक्स्ट बिग क्रियेतर अवॉर्ड असा हा मस्त प्रवास राहिला आहे.. आता पुढच्या प्रवासाकडे सातत्याने चालत राहणार आ…
  continue reading
 
SOCIAL MEDIA - श्राप की वरदान. सध्या शाळेत कश्या प्रकारचे निबंध लिहायला सांगतात माहिती नाही, पण जर माझ्या लहानपणी जर फेसबुक असतं तर ह्या विषयाचा निबंध नक्की लिहावा लागला असता. वापर करताना ज्या कलाकारांना कधीही लोकांपर्यंत पोहचायचं माध्यम मिळालं नसतं, त्या कलाकारांना अगदी फुकटात अनेक लोकांपर्यंत पोहचता आलं. अनेक लहान व्यावसायिकांना आपला धंदा social …
  continue reading
 
complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्यापेक्षा हा विश्वास बाळगला पाहिजे कि जरी समोरचा व्यक्ती चूक असेल तरी त्याला बदलायची जवाबदारी माझी आहे.. समोरच्याची चूक त्याला सांगताना त्याला त्याच्या भाषेत म्हणजे त्याला समजेल अश्या पद्धतीने सांगणे तितकेच आवश्यक आहे.. आणि उगाच complaint mode मध्ये र…
  continue reading
 
एखाद्या पारंपरिक गोष्टीला जेम्व्हा नवीन पिढी पर्यंत पोहोचवायचं असतं, तेंव्हा त्याला नवीन पद्धतीने मांडणे आवश्यक असते. संस्कृत ह्या आपल्या सनातन भाषेला नवीन पिढी पर्यंत नेण्यासाठी संस्कृत फॉर यू ह्या ग्रुप ने नवीन पिढीला आवडतील अश्या छान संस्कृत वाक्य आणि प्रिंट्स असलेल्या T Shirt काढल्या आणि त्या लोकांना खरोखरच आवडल्या. कॉलेज मध्ये सुरु झालेला हा प…
  continue reading
 
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा चौथा एपिसोड आहे - डोळस प्रेम म्हणजे काय ? असं म्हणतात प्रेम आंधळं असतं. सुरवातीला ते असेलही, पण हळू हळू त्या प्रेमाला डोळस पणे पाहून नात्याला भक्कम करण्यासाठी आवश्यक गोष्टींवर काम कराय…
  continue reading
 
प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे S3 EP0३ - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा तिसरा एपिसोड आहे - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे Made for each Other ही संकल्पना असली तरी …
  continue reading
 
S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा दुसरा एपिसोड आहे - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया !! बरेचदा अप[आपण समोरच्या व्यक्तीला judge करतो, पण ती व्यक्ती तशी का वागते ह्याचा विचार आपण करत नाही.…
  continue reading
 
सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आहे लग्नं ह्या एका खूप महत्वाच्या आणि गूढ विषयावर. हा सिजन ३ चा पहिला एपिसोड आहे - मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही.. मेड फॉर इच अदर ही एक संकल्पना आहे सत्य नाही पण ही एक प्रोसेस आहे आणि आपल्याला मेड फॉर इच अदर बनता येतं पण त्या साठी जाणीव…
  continue reading
 
माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना खूप महत्व आहे, जर आपल्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या growth वर पण साहजिकच होतो. मग नातेसंबंध का बिघडतात, ते सुधारण्यासाठी स्वतः मध्ये काय बदल घडवावे, स्वतः वर प्रेम करण का आवश्यक आहे, ते कसं आणि किती प्रमाणात करावं अश्या महत्त्वाचा विषयांवर आज…
  continue reading
 
गेलं १ १/२ वर्ष हे करोना मध्ये आपण सगळे अडकलो आहे. सारखे lockdown, रेस्ट्रीकशन्स ह्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे. नेमका कोणाला जास्त त्रास झाला आणि कोणी ह्यातून संधी शोधली ? खरंच पुढचा काळ भारताचा आहे का? भांडवल कसं मिळवता येईल ? भांडवल मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ? कोणत्या क्षेत्रांना जास्त scope आहे? अश्या अनेक विषयाव…
  continue reading
 
आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे. अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे. कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? …
  continue reading
 
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल. त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं. इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं. आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे. आपण पॉडकास्ट, youtube, blog, फेसबुक पोस्ट, tweet अश्या कुठल्याही …
  continue reading
 
आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी. अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे. तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे. हे सगळं netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून, म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिग…
  continue reading
 
स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट. मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत. आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो. रेकी…
  continue reading
 
निकेत करजगी हे एक executive coach आहेत. त्यांनी आता पर्यंत २लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रैनिंग दिला आहे. २००० तास पेक्षा जास्त कॉन्टेन्ट त्यांच्या कडे तयार आहे. आजच्या ह्या गप्पांमध्ये खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, एक म्हणजे आपला passion area शोधा, तो कसा शोधायचा त्या साठी टिप्स ह्या एपिसोड मध्ये दिल्या आहेत. त्यात काम करा आणि तत्यातून पैसे कमवा.…
  continue reading
 
जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही. Dos and Donts फॉर couple, जर परिस्थिती हाता बाहेर गेली तर काय करावे अश्या प्रश्नांवर बोललॊ आहे ह्या season २ च्या ५ व्य भागातBy NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE
  continue reading
 
मधुराज रेसिपी हे नाव youtube वर असण्याऱ्या मराठी माणसांनी ऐकलं नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांच्या यशा मागची गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल. आज मधुराजींशी झालेल्या ह्या गप्पान मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, त्या म्हणतात, स्वप्न बघा, ते पूर्ण करायला मनापासून प्रयत्न करा, पण फ्लेक्सिबल राहा, रिजिड नको असायला. कधी detour घायची गरज पडल…
  continue reading
 
आपलं passion कसं शोधावं ? passion सापडणं हे शेवट आहे की सुरवात ? सतत शिकतं का राहावं ? कोणत्या विषयाचं training घ्यावं ? coach कसा select करावा ? अश्या विषयांवर बोललॊ आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ३३व्या भागात मकरंद रेगे ह्यांच्याशी. मकरंद रेगे हे सिद्धार्थ लेअर्निंग सिस्टिम चे संस्थापक आहेत आणि २००१ पासून ते ट्रैनिंग आणि कोअचिंग क्षेत्रात काम करतात आह…
  continue reading
 
आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वाद होतं असतील तर पाहिलं पाऊल कोणी टाकायचं ? ज्या पार्टनरला awareness असेल त्यांनी काय करावं ? अश्या विषयांवर गप्पा केल्या आहेत ह्या एपिसोड मध्ये तुमच्या प्रतिक्रिया www.leenaparanjpe.com ; www.mipodcaster.com ह्या website वर भेट देऊन आमच्यापर्यंत नक्…
  continue reading
 
लग्नानंतर जर असं लक्षात आलं की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर असं समजावे की दोघांच्या मूळ स्वभावात फरक असल्यामुळे हे होतं आहे. अश्यावेळेस experts चा सल्ला नक्की घ्यावा. तुम्हाला हा Marathi Podcast कसा वाटतो आहे हे आम्हाला नक्की कळवा www.leenaparanjpe.com www.mipodcaster.com…
  continue reading
 
उद्योजक आणि व्यावसायिक ह्यात फरक आहे. समाजाला कशाची गरज आहे हे शोधणे, त्या साठी एखाद्या गोष्टीची मागणी नसेल तरी एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणे, त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता तयार करणे, त्यातून त्या वस्तू/सेवा ह्यासाठी मागणी तयार करणे. हे सगळं उद्योजक करत असतात. आपल्या देशात व्यावसायिक असतात पण उद्योजक नसतात असा साधणार चित्र दिसतं. समीर आणि …
  continue reading
 
मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ताईचं म्हणणं आहे की मित्र बनण्याच्या भानगडीत ना नवरा बायको बनता येतं ना मित्र. सुरवातीला नवरा बायको बना आणि मित्र आपोआप बनाल. ह्या थोड्या जरा वेगळ्या विषयावर बोललॊ आहे season २ च्या ह्या दुसऱ्या भागात. Your husband is not your friend, and your wife is…
  continue reading
 
लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंतवणूक केली जातं नाही. जर गुंतवणूक नाही केली तर परतावा कसा मिळणार ? म्हणून नात्यात गुंतवणूक करा आणि आयुष्यभर परतावा घेत राहा.. हि गुंतवणूक नेमकी कशी करावी हे बोललो आहे season २ च्या ह्या पहिल्या एपिसोड मध्ये.. Lot of planning goes into a wedding, a lo…
  continue reading
 
भारतात साधारण 30 कोटी लोकं youtube बघतात.. म्हणजे अमेरिकेच्या जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीचे youtube बघणारे लोक भारतात आहेत.. आणि jio आल्यावर ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे.. मग एवढे लोक जिथे असतात तिथे त्याची स्वतंत्र economy तयार होणं हे स्वाभाविक आहे.. पण ही स्वतंत्र economy जरी असली आणि खूप fame आणि पैसे कमावण्याची इथे संधी असली तरी, …
  continue reading
 
करिअर मध्ये अडकल्या सारखं वाटतं आहे का ? काहीतरी नवीन करावंसं वाटतं आहे का ? काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे का ? असेल तर हा एपिसोड नक्की ऐका, कारण तुमच्या प्रश्नांचं उत्तर कदाचित career coach हेमंत देशपांडे ह्यांच्याशी केलेल्या ह्या गप्पांमध्ये मिळू शकेल. www.HemantDeshpande.com Email: info@hemantdeshpande.com Phone: 7888070309 LinkedIn: https://ww…
  continue reading
 
सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे. ती रेष कशी ओळखावी? पालकांनी कसे वागावे किंवा वागू नये ? ह्यावर बोललो आहे ५व्या एपिसोड मधे.By NACHIKET KSHIRE & LEENA PARANJPE
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide