Download the App!
show episodes
 
आपला भवताल अनेकांच्या अनुभवांच्या परिघात फिरत असतो. म्हणूनच, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात, आचार-विचारांत, त्याच्या संकल्पनेत एक विलक्षण गोष्ट दडलेली असते. काही गुपितं दडलेली असतात आणि आयुष्याला जिंदादिल करु पाहणारी नवी दृष्टीही दडलेली असते. संडे विथ् देशपांडे या पॉडकास्टमधून अशाच व्यक्तींसमवेत संतोष देशपांडे यांची संवादाची झकास मैफल रंगते आणि तुम्हाला आयुष्यावर आणखी प्रेम करायचं शिकवते. रविवार आवडणाऱ्या प्रत्येकासाठी केव्हाही ऐकता येईल अशी पेशकश.
  continue reading
 
Loading …
show series
 
मुंबईतील शरद कुलकर्णी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माउंट एव्हरेट केले. असे करणारे ते पहिले भारतीय ज्येष्ठ नागरिक ठरले. त्यांची जिद्द, ध्येयासक्ती यामुळे हे शक्य झाले असले तरी त्यांच्या या यशाला एक हळवी, वेदनामय किनार आहे. एव्हरेट शिखर सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नांत त्यांना सोबत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीस गमवावे लागले. …
  continue reading
 
प्राण्यांशी आपण संवाद साधू शकतो का, त्यांच्या मनातलं कळू शकतं का? त्यांना आपल्या मनातलं सांगू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा संडे विथ् देशपांडे पॉडकास्ट मालिकेतील हा विशेष भाग. टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र ज्यांना गवसले, असे लोक प्राण्यांशी संवाद साधू शकतात. या विषयातील तज्ज्ञ प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे चक्रनारायण यांना संतोष…
  continue reading
 
अध्यात्माशी जवळीक असणाऱ्या अनेकांसाठी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारचे स्वप्न. पुण्यातील प्रशांत चितळे यांनी बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडून अध्यात्ममार्गात जाण्याचे ठरविले आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून पायी नर्मदा परिक्रमा केली. सहा महिने, सहा दिवस चाललेली ही नर्मदा परिक्रमा नेमकी कशी घडली, त्यात त्यांना आलेले अनुभव काय होते, त्यांची निरीक्षणे…
  continue reading
 
ज्यांची पोटभर सोडा, एक वेळ जेवणाचीही भ्रांत असते अशा भुकेल्या लोकांचं जग तुम्ही कधी पाहिलंय? पुण्यातील कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे गिरीराज सावंत यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं फूड फॉर हंग्री अर्थात, भुकेल्यांसाठी घास हा उपक्रम सुरु केला, रोज शेकडो भुकेल्यांसाठी फूड पॅकेजेस् तयार करुन पोहोचविणारी यंत्रणा त्यांनी उभा केली आणि अनुभवांती एक विलक्षण वास्त…
  continue reading
 
महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे राज्याचे निवृत्त विशेष पोलिस महासंचालक श्री. रवींद्र सेनगावकर हे अत्यंत वेगळ्या पठडीतील व्यक्तिमत्व. सेवानिवृत्तीनंतर सुखनैव आराम करण्याचा पर्याय असतानाही, त्यांनी राज्यातील तरुणांना पोलिस व प्रशासकीय सेवेसाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धीकदृष्ट्या तयार करण्यासाठी…
  continue reading
 
महाराष्ट्राला अखेर राज्यगीत मिळाले. गेली ६३ वर्षे मराठी माणसाला प्रेरणादायी ठरणारं, अनोखं चैतन्य जागवणारं `जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा` हे गीत आता राज्यगीत म्हणून बहाल झालं आहे. असं काय आहे या गीतात, जे तुमच्या-आमच्या मनातील मराठी बाणा व्यक्त करतं? देशाप्रति असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करुन देतं, याविषयी दस्तुरखद्द महाराष्ट्राचे सांस…
  continue reading
 
अमेरिकेतील पहिले मराठी खासदार म्हणजे श्री ठाणेदार. जितके उमदे व्यक्तिमत्व, तितकेच विनम्र...विचारी आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत. असे हे श्री ठाणेदार, ज्यांनी अमेरिकेत जाऊन शून्यातून स्वतःचे उद्योगविश्व उभारले, आता मिशिगनसारख्या मोठ्या राज्यातून ते अमेरिकन कॉंग्रेसमन (खासदार) बनले आहेत. त्यांचा हा सार्वजनिक, राजकीय जीवनातील प्रवास जाणून घेतानाच त्या…
  continue reading
 
Loading …

Quick Reference Guide