Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]
Manage episode 358839790 series 3460479
आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे? यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते !!! होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे ? गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय ? पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे ? या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला ; पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी !!! सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत !! 'डॉक्टर... एक विचारू?' हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
73 episodes