# 1535: बीथोवनचा केस . लेखक : बिपीन देशमाने. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 431685542 series 3431535
बरोबर दोनशे वर्षांपूर्वीची घटना आहे. ७ मे १८२४ रोजी व्हिएन्ना येथे बिथोवन यांनी रचलेल्या सिम्फनी क्रमांक ९ प्रीमियर होता.
हॉल खचाखच भरला होता. या शोला अभूतपूर्व, प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करू लागले. स्टँडिंग ओव्हेशन!
बिथोवन यांना मात्र याची काहीच कल्पना नव्हती!
ते वादकांकडे तोंड आणि प्रेक्षकांकडे पाठ करून संचालन करत होते.
शेवटी एका गायकाने स्वतः जाऊन हाताला धरून त्यांचे प्रेक्षकांकडे तोंड करवले.
तेव्हा या महान संगीतकाराला प्रेक्षकांनी दिलेले स्टॅंडिंग ओव्हेशन दिसले, ऐकायला आले नाही!
कारण त्यावेळी ते ठार बहिरे होते!
1546 episodes