# 1536: मृत्युदूत व जीवन दाता शास्त्रज्ञ फ्रिट्झ हार्बर. लेखक : अनघा पाठक. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 431927415 series 3431535
फ्रिट्झ यांचा मानसपुत्र इतिहासकार फ्रिट्झ स्टर्न लिहितात, “हाबर यांनी आपलं आयुष्य विज्ञानाला वाहिलं होतं. पण आपलं देशप्रेम सतत सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी युद्धात वापरल्या जाणाऱ्या विषारी वायूंचा शोध लावला. पहिल्या महायुद्धात या वायुंमुळे हाहा:कार उडाला. दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ह्या वायूंचा उपयोग हिटलरने छळछावण्यांमध्ये केला. ”
एकोणिसावं शतक संपत आलं तेव्हा जगाला एका प्रचंड मोठा प्रश्न भेडसावत होता – भूक!
लोकसंख्या वाढत होती, खाणारी तोंड वाढत होती पण जमीन आहे तेवढीच होती. त्यातून जेवढं उत्पन्न येत होतं तेवढंच येणार होतं.ह्या वेळी फ्रिट्झने हवेतल्या नाइट्रोजन व हायड्रोजन पासून अमोनिया निर्माण करण्याचाम्हणजेच रासायनिक खतांचा शोध लावला.
विसाव्या शतकातला हा सर्वात मोठा शोध होता. त्यामुळे
त्याचे कौतुक त्यावेळी ‘हवेतून ब्रेड काढणारा’ शास्त्रज्ञ अशा शब्दात झालं होतं.आईनस्टाईन यांनी स्वतः फ्रिट्झबद्दल म्हटलं आहे, “जर्मन ज्यूच्या कहाणीचा दुःखान्त म्हणजे हाबर यांचं आयुष्य आहे. जर्मनीवर त्यांनी एकतर्फी प्रेम केले .
1546 episodes